September 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पिरंगुट पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गोपाल कला उत्साहात साजरी

पिरंगुट :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट येथे ३ सप्टेंबर २०२६ रोजी गोपाल कला उत्सव उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

 

या उत्सवात पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाची वेशभूषा करून श्रीकृष्णाच्या बाललीलांचे सुंदर दर्शन घडविले. रंगीबेरंगी वेशभूषेमुळे संपूर्ण शाळेचा परिसर कृष्णमय झाला.

उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी तयार केलेली मातीची हंडी व त्यामध्ये भरलेला मुरमुरा. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांचे महत्त्व आनंददायी पद्धतीने समजावून देण्यात आले.हा कार्यक्रम चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ. रेखा बांदल मॅडम, संचालिका कु. शिवानी बांदल आणि सर्व शाखा प्रमुख प्राचार्या सौ. निर्मल पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आनंद, भक्ती, उत्साह आणि एकतेचा संदेश देत हा गोपाल कला उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचेसंपूर्ण कार्यक्रम प्रमुख प्राचार्या सौ. निर्मल पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्याध्यापिका सौ. इनायत मुजावर मॅडम यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. पल्लवी नारखेडे मॅडम, प्राथमिक विभाग प्रमुख सौ. सना इनामदार मॅडम आणि माध्यमिक विभाग प्रमुख सौ. रुपाली गर्ग मॅडम यांच्या सहकार्याने सर्व, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्साहाला पालकांनीही सहकार्य केले.