पिरंगुट :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन तसेच महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या महत्त्वाविषयी माहिती देण्यात आली. मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्याची आणि भारतीय क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. खेळाचे महत्त्व, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, संघभावना आणि खिलाडूवृत्ती याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
हा कार्यक्रम चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ. रेखा बांदल मॅडम, संचालिका कु. शिवानी बांदल आणि सर्व शाखा प्रमुख प्राचार्या सौ. निर्मल पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
मुख्याध्यापिका सौ. इनायत मुजावर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “खेळामुळे शरीर निरोगी राहण्यासोबतच शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित होते,” असा प्रेरणादायी संदेश दिला. तसेच श्रवण नारखेडे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्यावर प्रेरणादायी भाषण केले.
संपूर्ण कार्यक्रम प्रमुख प्राचार्या सौ. निर्मल पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्याध्यापिका सौ. इनायत मुजावर मॅडम यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. पल्लवी नारखेडे मॅडम, प्राथमिक विभाग प्रमुख सौ. सना इनामदार मॅडम आणि माध्यमिक विभाग प्रमुख सौ. रुपाली गर्ग मॅडम यांच्या सहकार्याने सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अथक परिश्रमातून यशस्वीरीत्या संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी नियमित व्यायाम व खेळांमध्ये सहभागी होण्याचा संकल्प केला. राष्ट्रीय क्रीडा दिनाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम, शिस्त, आरोग्यविषयक जागरूकता आणि खिलाडूवृत्ती निर्माण करणारा ठरला.





























More Stories
*राखीच्या धाग्यातून जपली माणुसकी; बावधनच्या पेरीविंकल विद्यार्थ्यांनी सावलीतील बालकांसोबत साजरे केले रक्षाबंधन!*
*राखी बांधली, माणुसकी जपली! सुस शाखेतील पेरीविंकच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने अनाथाश्रमात बांधला प्रेमाचा अनोखा धागा*!!
पेरिविंकलमध्ये रोबोटिक्सचा मेळावा; विद्यार्थ्यांच्या कल्पनांना तंत्रज्ञानाचे पंख