औंध :
रयत शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विद्यामंदिर, औंध गाव येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून पालखी सोहळ्याचे अतिशय उत्साही आणि भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात वारकरी संप्रदायाच्या परंपरेसोबतच सामाजिक आणि शैक्षणिक प्रबोधनाचा सुंदर संगम पाहायला मिळाला
सोहळ्याची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात झाली. आंबेडकर विद्यालयाचे लाईफ मेंबर प्राध्यापक भुजबळ सर तसेच महात्मा गांधी प्राथमिक विद्यामंदिर, मंचरचे माननीय मुख्याध्यापक आणि त्यांचे सहकारी शिक्षक यांच्या शुभहस्ते पालखीचे विधिवत पूजन व आरती करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दवंडे एस एम , व त्यांचे सहकारी शिक्षक उपस्थित होते.
केवळ धार्मिक परंपराच नव्हे, तर सामाजिक भान जपत विद्यालयाच्या वतीने ‘वृक्षदिंडी’ आणि ‘ग्रंथदिंडी’ चे आयोजन करण्यात आले होते.
विठू माऊलीच्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरत निघालेल्या या दिंडीत लहानग्या विद्यार्थ्यांनी सर्वांची मने जिंकून घेतली. पारंपारिक वारकरी पोशाखात आलेल्या विद्यार्थ्यांनी आकर्षक लेझीम प्रात्यक्षिके सादर केली. मुलांनी विठ्ठल-रखुमाईच्या अभंगांवर सुंदर नृत्ये सादर करून संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन टाकला.
“शालेय वयातच मुलांवर संस्कार व्हावेत आणि त्यांना आपल्या संस्कृतीची तसेच पर्यावरणाची ओळख व्हावी, या उद्देशाने या बहुविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.”
या दिंडी सोहळ्यासाठी औंध गावातील नागरिक, पालक आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विठ्ठलाचा जयघोष आणि मुलांचा उत्साह यामुळे हा सोहळा अत्यंत यशस्वी आणि संस्मरणीय ठरला.



More Stories
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी
*‘भक्तीचा उत्सव, पर्यावरणाची जपणूक!’ — पेरिविंकल बावधनमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या Eco-Friendly गणेशमूर्ती!!*
वसुंधरा अभियानाच्या २०व्या वर्धापनदिनानिमित्त राजाभाऊ गुडदे फाउंडेशनचा सन्मान