पाषाण :
खासदार तथा केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्र. ९ मधील नागरिकांसाठी ‘खासदार सेवा आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत नागरी समस्या निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध नागरी समस्या स्वीकारून त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधला जाणार आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य आणि विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
शनिवार – दिनांक – 11/07/2026
वेळ – सकाळी 10 AM ते दुपारी 2 PM
ठिकाण – श्रीराम मंदिर, बाणेर गाव, बाणेर, पुणे.
लोकेशन – https://maps.app.goo.gl/BHk9uvkKDt8AQeXq6?g_st=ic
शनिवार – दिनांक – 11/07/2026
वेळ – संध्याकाळी 5 PM ते 8 PM
ठिकाण – श्री गणेश मंदिर, कोकाटे आळी, पाषाण गाव, पुणे.
पुणे.
लोकेशन – https://maps.app.goo.gl/8KrVWSsyo6Xc3aaC6?g_st=ic
रविवार – दिनांक:- 12/07/2026
वेळ – सकाळी 10 AM ते दुपारी 2 PM
ठिकाण – विठ्ठल रुक्मिणी मंदिर, बालेवाडी गाव, बालेवाडी, पुणे.
लोकेशन – https://maps.app.goo.gl/LKmP8xKRMjXQSyi67?g_st=ic
नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
📌 शिबिरामध्ये विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येईल.
शिबिरामध्ये खालील सेवा व योजनांचा लाभ घेता येईल
✅ आपल्या परिसरातील नागरी समस्या
✅ आयुष्मान भारत कार्ड (ABHA कार्ड)
✅ ज्येष्ठ नागरिक कार्ड
✅ आधार कार्ड दुरुस्ती / नोंदणी
✅ SIR मॅपिंग
✅ अन्न व नागरी पुरवठा विभागाशी संबंधित सेवा (रेशन कार्ड)
✅ महिला व बालकल्याण विभागाच्या योजना
✅ संजय गांधी निराधार योजना
✅ श्रावणबाळ निराधार योजना
✅ दिव्यांग पेन्शन योजना
✅ दिव्यांग व्यक्तींसाठी PMPML मोफत बस पास
✅ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने ची EKYC
✅ महावितरण संबंधित प्रश्न
✅ पुणे महानगरपालिकेच्या विविध योजनांचा लाभ
✅ इयत्ता १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी पुणे महानगरपालिकेच्या योजनांचा लाभ
✅ पाणीपुरवठा, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, रस्ते, वीज व इतर नागरी समस्यांबाबत तक्रारी
✅ सर्व प्रकारचे निवेदन स्वीकारले जातील.
🪪 कृपया आधार कार्डची झेरॉक्स प्रत व गरजेनुसार महत्त्वाची कागदपत्रे सोबत आणावी.
या शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या नागरी समस्या मांडाव्यात तसेच विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल च्या वतीने करण्यात आले आहे.


More Stories
म्हाळुंगे येथील श्री इच्छापूर्ती गणपती मंदिरात कलश यात्रा उत्साहात संपन्न..
बाणेर स्मशानभूमीसाठी पालिकेची निष्क्रियता, संवेदनशीलता दाखवत जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनकडून 125 KVA जनरेटर सेट व पत्रा शेड; अखंडित वीजपुरवठ्यासाठी पुढाकार
*नदी सुधार प्रकल्पाचा बाणेर-बालेवाडीला फटका; मुसळधार पावसामुळे सोसायट्यांमध्ये शिरले पाणी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण*