बालेवाडी :
आषाढी एकादशीनिमित्त बालेवाडी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजय बालवडकर, नगरसेवक अमोलभैय्या बालवडकर आणि राहुलदादा बालवडकर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत पंढरपूर यात्रेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला यंदा ३२ वर्षे पूर्ण झाली असून, या यात्रेत सुमारे ९५० वारकरी भाविकांनी सहभाग घेतला.
विठुरायांच्या दर्शनासाठी निघालेली ही यात्रा १९ बसेसद्वारे पंढरपूरकडे रवाना झाली. विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषाने आणि नामस्मरणाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. वारकरी संप्रदायाच्या परंपरेला साजेशा उत्साहात आणि भक्तिभावात भाविकांनी यात्रेला प्रारंभ केला.
“या यात्रेच्या माध्यमातुन समस्त वारकरी संप्रदायाची सेवा गेली ३२ वर्षे आमच्या हातुन घडत असुन समस्त वारकरी मायबापांचे आशिर्वाद यातुन मिळत आहेत, तसेच सांप्रदाय क्षेत्राची हि सेवा करत असल्याचे समाधान यातुन मिळत आहे” असे यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले.
यात्रेच्या शुभारंभप्रसंगी संजय बालवडकर, राहुलदादा बालवडकर, ज्ञानेश्वरभाऊ तापकीर, सुनिलजी चांदेरे, प्रकाशतात्या बालवडकर, अनिल बालवडकर, वैशालीताई कमाजदार, कल्याणीताई टोकेकर, समस्त महिला भजनी मंडळ तसेच मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविक उपस्थित होते.



More Stories
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी
*‘भक्तीचा उत्सव, पर्यावरणाची जपणूक!’ — पेरिविंकल बावधनमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या Eco-Friendly गणेशमूर्ती!!*