बाणेर :
बाणेर स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या वतीने 125 KVA क्षमतेचा जनरेटर सेट स्वखर्चातून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या संदर्भात पुणे महानगरपालिकेकडे जनरेटर सेट बसविण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन फाउंडेशनने हा निर्णय घेतल्याची माहिती जयेश मुरकुटे यांनी दिली.
याशिवाय, स्मशानभूमीतील पार्थिव ठेवण्याच्या जागेवर नागरिकांना पावसाळा व उन्हाळ्यात होणारा त्रास टाळण्यासाठी जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून स्वखर्चाने पत्राशेड उभारण्यात आले आहे.
यावेळी जयेश मुरकुटे म्हणाले की, “अंत्यसंस्कारासारख्या संवेदनशील प्रसंगी नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, ही आमची भूमिका आहे. प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसला तरी लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.”
या निर्णयामुळे बाणेर परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात असून, स्मशानभूमीतील मूलभूत सुविधांमध्ये भर पडणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.





























More Stories
तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये पेरिविंकल पौडच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
सूस-नांदे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा आणि सनीज वर्ल्डचा पुढाकार
“तायक्वांदोच्या मैदानात पेरिविंकलचा दबदबा; १६ पदकांची शानदार कमाई!”