July 10, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

म्हाळुंगे येथील श्री इच्छापूर्ती गणपती मंदिरात कलश यात्रा उत्साहात संपन्न..

म्हाळुंगे :

येथील व्हीटीपी म्हाळुंगे, अल्पाइन आणि कुल इकोलॉक सोसायटीसमोरील श्री इच्छापूर्ती गणपती मंदिरात विविध देवतांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा नियोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचा भाग म्हणून मंदिरात मोठ्या उत्साहात श्री कलश यात्रा सोहळा संपन्न झाला.

या सोहळ्याला पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका रोहिणी चिमटे यांनी विशेष उपस्थिती लावून कलश यात्रेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. ‘बोलावे तसे चालावे’ या उक्तीप्रमाणे प्रत्यक्ष कृती करत त्यांनी भर पावसातही महिला भाविकांसोबत संपूर्ण परिक्रमा पूर्ण केली. कलश यात्रेनंतर झालेल्या महाआरतीला उपस्थित राहून त्यांनी आरती केली व त्यानंतर भाविकांसाठी तयार करण्यात आलेल्या अल्पोपहाराचा आस्वाद घेतला. म्हाळुंगे येथील रहिवासी आणि भारतीय जनता पक्षाच्या उत्तर मंडळाच्या युवा मोर्चा सरचिटणीस जागृती विचारे या देखील या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान उपस्थित होत्या. 

हा धार्मिक उत्सव यशस्वी करण्यासाठी परिसरातील प्रमुख नागरिकांनी आणि गणेश भक्तांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये देवकीनंदन राठी, मनोहर जोशी, अनिल कलाजे, प्रसन्ना जैन, माया ठाकूर, कांतीलाल सर्जेराव देशमुख, के एम कसारे, गोकुळ पाटील, सिविका महाजन, अर्पिता अग्रवाल, बापू श्रीपती कोळेकर (API), रमेश खैरनार, चंद्रकांत पतंगे, अरुण लंके, अशोक वंजोले, हरीश्चंद्र टिकोर, अशोकराव धोंडू विचारे, रामदास साळुंके, शिवानी सुधीर पाटेकर आणि अंकुश पाडाळे यांसह बहुसंख्येने नागरिक व भाविक उपस्थित होते.