July 6, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर-बालेवाडी मेडिकोस असोसिएशनचा ‘चतुरंग’ सांस्कृतिक सोहळा उत्साहात संपन्न

पुणे :

बाणेर-बालेवाडी मेडिकोस असोसिएशन (BMA) आयोजित ‘चतुरंग’ हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम ५ जुलै रोजी यशदा, पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते श्री. महेश मांजरेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच बाणेर-बालेवाडीचे नगरसेवक श्री. बाबुराव चांदेरे आणि श्री. राहुल बालवडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात डॉक्टरांनी नृत्य, गायन आणि विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सुधीर निखारे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच डॉ. शैलेश हडगावकर आणि डॉ. सुवर्णा साळवे यांना Pride of BMA पुरस्काराने गौरविण्यात आले.

संपूर्ण कार्यक्रमाचे दिग्दर्शन डॉ. प्रसाद बिवरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉ. अश्विनी केसकर, डॉ. विद्या पंडित आणि डॉ. प्रिया देशपांडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रमोद उमरजी, संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेश देशपांडे, डॉ. बाबन साळवे, डॉ. सागर सुपेकर, डॉ. कविता चौधरी आणि डॉ. ऋतु लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

बाणेर-बालेवाडी मेडिकोस असोसिएशनचे आज ५०० हून अधिक तज्ज्ञ डॉक्टर सदस्य असून, संस्था सामाजिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. ‘चतुरंग’सारख्या उपक्रमांमुळे डॉक्टरांमधील स्नेह, सांस्कृतिक जाणीव आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.