July 6, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर तुकाई टेकडीवर राजाभाऊ गुडदे फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न

बाणेर :

राजाभाऊ गुडदे फाउंडेशनच्या 6 व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच शोभा चौथमल यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त शनिवार, ५ जुलै रोजी तुकाई टेकडी येथे वसुंधरा अभियान यांच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात अनेक पर्यावरणप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संगीत गुडदे, धनंजय गवारे, दर्शना गवारे, सुमित खैरनार, सीमा पवार, विशाल पारखे, रितिका जैन, अनुराधा अग्रवाल, विपुल शिंदे, स्वाती बुटोले, शुभांगी शिंदे, श्वेता पवार, पल्लवी देव, ब्रह्मदेव भांडवलकर, अतुल भिडे, तुषार वानखेडे, मनोज जोशी, स्वप्नील जैन, मनोज माने आणि कोमलसिंग राजपूत यांनी मोलाचे सहकार्य केले.

यावेळी राजाभाऊ गुडदे फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.किरण गुडदे यांनी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. तसेच उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व सहभागी, स्वयंसेवक आणि वसुंधरा अभियानचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.