August 24, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरीविंकल पौड शाखेत जागतिक डॉक्टर दिन उत्साहात साजरा झाला.

पौड :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या *पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज*, पौड शाखेमध्ये आज शुक्रवार दिनांक *1 जुलै 2026 रोजी जागतिक डॉक्टर दिन* अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

 

कार्यक्रमाची सुरुवात *सरस्वती पूजनाने झाली.यावेळी *पेरीविंकल प्रशालेच्या संचालिका शिवानी बांदल मॅडम* प्रमुख पाहुणे डॉक्टर हिरामण गावीत, (सूर्या हॉस्पिटल, लवळे) डॉक्टर नीता मंडलेचा (श्री गणेश हॉस्पिटल घोडावत) . आणि *मुख्याध्यापिका वीणा कदम मॅडम* उपस्थित होत्या.प्रशालेच्या विद्यार्थी संस्कृती पिंगळे हिने ह्या दिवसाचे महत्व सांगितले.

डॉक्टर गावीत ह्यानी निरोगी आरोग्य ह्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉक्टर नीता मंडलेचा ह्यांनी रोजचा सकस आहारामध्ये फळे, पालेभाज्या ह्याचे महत्व पटवून दिले. डॉक्टर वेषभूषा करून आलेले केजी चे विद्यार्थी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.

कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र आणि संचालिका रेखा बांदल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. पेरिविंकल ग्रुप च्या मुख्य प्रिन्सिपल निर्मल पंडित, मुख्याध्यापिका वीणा कदम, पर्यवेक्षक नेत्रा काकडे, प्राजक्ता वाघवले शिक्षक प्रतिनिधी रसिका जोशी, अश्विनी देसाई, संध्या देशमुख ह्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.