बालेवाडी :
बालेवाडी येथील साई चौक परिसरातील सर्व्हे क्रमांक ४ मधून वाहणाऱ्या ओढ्यात मोठ्या प्रमाणावर झाडी-झुडपे व गाळ साचल्याने पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला होता. यामुळे आगामी पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली होती.
या गंभीर समस्येची दखल घेत भारतीय जनता पार्टीचे कोथरूड विधानसभा उत्तर मंडल सरचिटणीस मोरेश्वर बालवडकर यांनी संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने ओढा साफसफाईच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.
आज जेसीबीच्या सहाय्याने ओढ्यातील वाढलेली झाडी-झुडपे, गाळ आणि इतर अडथळे हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. या कामामुळे पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह सुरळीत राहण्यास मदत होणार असून परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी स्थानिक नागरिकांनी प्रशासन व मोरेश्वर बालवडकर यांचे आभार मानले. नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि परिसराच्या विकासासाठी पुढेही सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे बालवडकर यांनी सांगितले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी