February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरीविंकल पौड शाखेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पौड :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या *पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज*, पौड शाखेमध्ये आज सोमवार, दिनांक *26 जानेवारी 2026* रोजी *प्रजासत्ताक दिन* अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात *कदम तालावर पाहुण्यांच्या स्वागताने* झाली. यावेळी *पेरीविंकल प्रशालेच्या संचालिका शिवानी बांदल मॅडम* आणि *मुख्याध्यापिका वीणा कदम मॅडम* उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीत इयत्ता दहावीचा विद्यार्थी *नील हुलावळे* च्या हस्ते *ध्वजवंदन* करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून *पौड गावातील मान्यवर* उपस्थित होते.

*राष्ट्रगीताने तिरंग्याला सलामी* दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी *झेंडा गीत* सादर केले. कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांनी आपले *मार्गदर्शनपर विचार* व्यक्त केले.

मुख्याध्यापिका *वीणा कदम मॅडम* यांनी सर्वांना *प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा* दिल्या आणि देशाविषयी असणारी *भक्ती व निष्ठा* व्यक्त केली. संचालिका *शिवानी बांदल मॅडम* यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन *संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल सर* आणि *संचालिका रेखा बांदल मॅडम* यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. मुख्याध्यापिका *वीणा कदम मॅडम*, पर्यवेक्षिका *नेत्रा काकडे, मयुरी दोशी, रोहिणी शेंडे*, तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी वर्ग यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम *शिस्तबद्ध आणि उत्साहात* पार पडला.

कार्यक्रमाची सांगता *श्रेया शिंदे* यांच्या *आभार प्रदर्शनाने* झाली. सूत्रसंचालन *स्वयंम तोंडे* आणि *वेदांत बलकवडे* यांनी केले.