पुणे प्रतिनिधी :
कोरोना महामारीसारख्या भीषण संकटाच्या काळात माणुसकी, कर्तव्यनिष्ठा आणि संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण करणारे महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी पीएसआय श्री. सुधीर विद्याधर खडतरे यांना न्यायप्रभात समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
श्री. सुधीर खडतरे सध्या पोलीस मुख्यालय, पाषाण, पुणे येथे पीएसआय म्हणून कार्यरत असून ते कैलास हौसिंग सोसायटी, बिल्डिंग ए-२, प्लॉट नं. १३, शास्त्रीनगर, कोथरूड, पुणे येथे वास्तव्यास आहेत.
कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण समाजात भीती, अस्वस्थता व अनिश्चिततेचे वातावरण असताना, खेड शिवापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या पीएसआय सुधीर खडतरे यांनी कर्तव्यापलीकडे जाऊन समाजसेवेचा आदर्श घालून दिला. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना अनेक कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी त्यांनी तातडीने वाहनांची सोय करून रुग्णांना दवाखान्यात पोहोचवले. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना मानसिक आधार देत योग्य मार्गदर्शन केले.
लॉकडाऊन काळात रोजगार बंद झाल्याने अनेक गरजू कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. अशा परिस्थितीत पीएसआय खडतरे यांनी पुढाकार घेत अन्नधान्य, भाजीपाला तसेच कपड्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. अनेक वेळा त्यांनी स्वतः मदत पोहोचवून गरजू नागरिकांना आधार दिला.
कोरोनाच्या कठीण काळात खेड शिवापूर परिसरात त्यांनी दाखवलेले धैर्य, संवेदनशीलता व माणुसकी आजही नागरिकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे पोलीस दलाबद्दल जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
महाराष्ट्र पोलिसांच्या खाकी वर्दीतील देवदूत म्हणून ओळखले जाणारे आदरणीय सुधीर खडतरे साहेब हे कर्तव्याबरोबरच मानवतेची जपणूक करणारे खरे समाजसेवक आहेत. त्यांचे सेवाभावी व कर्तव्यनिष्ठ कार्य निश्चितच गौरवास्पद व समाजासाठी प्रेरणादायी आहे.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!