सूस :
पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यश संपादन केल्याबद्दल नवनिर्वाचित नगरसेवक बाबुराव चांदेरे आणि अमोल बालवडकर यांचा समस्त सूस ग्रामस्थांच्या वतीने नागरी सन्मान सोहळा सूस गावठाण येथील श्री काळभैरवनाथ मंदिर परिसरात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमास सूस ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. ग्रामस्थांनी दिलेल्या मनापासूनच्या शुभेच्छा, प्रेमळ शब्द आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा क्षण सर्वांसाठी भावनिक व संस्मरणीय ठरला. काळभैरवनाथ मंदिराच्या पवित्र सान्निध्यात झालेला हा सन्मान केवळ गौरवाचा नसून, लोकप्रतिनिधी आणि गावकऱ्यांमधील नातेसंबंध अधिक दृढ करणारा ठरला.
यावेळी बोलताना नगरसेवक बाबुराव चांदेरे व अमोल बालवडकर यांनी सूस ग्रामस्थांनी दाखवलेल्या आपुलकी, एकजूट आणि विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आणि भावना या पुढील काळात अधिक संवेदनशीलपणे व प्रामाणिकपणे काम करण्याची प्रेरणा देणाऱ्या असल्याचे त्यांनी सांगितले.
या यशामागे निस्वार्थ भावनेने साथ देणारे कार्यकर्ते, घराघरांत जाऊन सकारात्मक वातावरण निर्माण करणारे हितचिंतक, ज्येष्ठांचा आशीर्वाद, युवकांचा उत्साह आणि महिला भगिनींचा सक्रिय सहभाग यांचे मोठे योगदान असल्याचेही त्यांनी नमूद केले. सूस ग्रामस्थांनी दिलेला विश्वास हा मानाचा आणि जबाबदारीचा ठेवा असून, विकासाच्या माध्यमातून त्याला न्याय देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!