सुस :
पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबुराव चांदेरे आणि अमोल बालवडकर यांनी घवघवीत विजय मिळवत नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा मान पटकावला आहे. या विजयाच्या पार्श्वभूमीवर सुसगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोषात आनंद साजरा केला.
या प्रसंगी गावातील प्रमुख चौकांमध्ये नागरिकांना पेढे वाटून विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. “हा विजय म्हणजे जनतेच्या विश्वासाचा कौल आहे,” अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. सुसगाव परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयामुळे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
नव-निवडून आलेले नगरसेवक बाबुराव चांदेरे आणि अमोल बालवडकर यांनी मतदारांचे आभार मानत, प्रभागातील मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.





























More Stories
तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये पेरिविंकल पौडच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
सूस-नांदे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा आणि सनीज वर्ल्डचा पुढाकार
“तायक्वांदोच्या मैदानात पेरिविंकलचा दबदबा; १६ पदकांची शानदार कमाई!”