बालेवाडी :
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त राजाभाऊ गुडदे फाउंडेशन यांच्या वतीने बालविकास–४ हा उपक्रम दिनांक १७ जानेवारी रोजी जिल्हा परिषद शाळा,कोंढणपूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. खेळांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य (स्टेशनरी) देण्यात आले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. क्षिरसागर मॅडम यांनी सहकार्य केले.
या कार्यक्रमासाठी श्री. बुटोले सर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी राजाभाऊ गुडदे फाऊंडेशन चे कर्मचारी,इंटेग क्लाउड्स या सॉफ्टवेअर कंपनीचे हुसेफा कमरी, वैभव अंचरवाडकर व कर्मचारी तसेच श्री.सुभाष चौथमल, श्री.ब्रह्मदेव भांडवलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
याच उपक्रमाच्या अनुषंगाने आदिवासी वस्तीला भेट देऊन स्वच्छता, आरोग्य आणि आरोग्यविषयक माहिती देण्यात आली. तसेच गरजू कुटुंबांना ब्लँकेट व टॉर्चचे वितरण करण्यात आले. याशिवाय गोशाळेला भेट देऊन गूळ व चारा देण्यात आला.
या उपक्रमातून राजाभाऊ गुडदे फाऊंडेशन च्या अध्यक्षा सौ किरण संगीत गुडदे यांनी सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण, आरोग्य आणि मानवतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमास जि. प. शाळा -कोंढणपूर
ता. हवेली, जि.–पुणे शिक्षक वर्ग श्री रामदास आगावणे, श्री सुभाष सोनके, आणि शिक्षकांचा, संस्थेचे आणि कंपनी चे कर्मचारी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!