बावधन :
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी पतंग उडविण्याचा सण अत्यंत आनंदी व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती व सणपरंपरांची जाणीव निर्माण करण्याचा उद्देश साध्य करण्यात आला.
हा कार्यक्रम माननीय मुख्याध्यापिका सौ.आसावरी हंचाटे मॅडम यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तसेच सर्व शिक्षकांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांनी घरून रंगीबेरंगी पतंग आणून उत्स्फूर्त सहभाग घेतला, ज्यामुळे संपूर्ण शाळा परिसर आनंद आणि चैतन्याने भारावून गेला.
कार्यक्रमादरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मकर संक्रांतीचे महत्त्व, तसेच सुरक्षित व जबाबदारीने पतंग उडविण्याचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी माननीय मुख्याध्यापिका सौ. आसावरी हंचाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी प्रेरित केले.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!