बालेवाडी :
सफा बँक्वेट हॉल, बालेवाडी येथे आयोजित व्यापारी संघाची बैठक उत्साहपूर्ण व सकारात्मक वातावरणात पार पडली. या बैठकीत बालेवाडी परिसरातील व्यापाऱ्यांनी व्यवसायाशी निगडित अडचणी, वाहतूक व पार्किंगचे प्रश्न तसेच भविष्यातील व्यापारी विकासाबाबत आपली मते मांडली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती गायत्री मेढे-कोकाटे, श्री. बाबुराव चांदेरे, कु. पार्वती निम्हण तसेच अमोल बालवडकर उपस्थित होते. सर्व उमेदवारांनी व्यापारी वर्गाच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहत, त्यावर प्रत्यक्ष व शाश्वत उपाययोजना राबवण्याची ठाम भूमिका मांडली.
बैठकीदरम्यान व्यापाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या. या प्रश्नांच्या निराकरणासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा विश्वास उपस्थित उमेदवारांनी दिला. व्यापारी संघाच्या सहकार्याने बालेवाडी परिसरातील व्यापार अधिक सक्षम, सुव्यवस्थित व विकासाभिमुख करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीमुळे व्यापारी वर्गात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, स्थानिक विकासासाठी समन्वयाने पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र दिसून आले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी