September 18, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सुतारवाडीत महाविकास आघाडीच्या उमेदवार संदीप बालवडकर यांच्या प्रचारार्थ गावभेट दौरा उत्साहात संपन्न

सुतारवाडी :

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुतारवाडी येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संदीप बालवडकर यांच्या प्रचारार्थ गावभेट दौरा मोठ्या उत्साहात पार पडला. या दौऱ्याला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या वेळी सुतारवाडीतील स्थानिक गावकरी, महिला भगिनी, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवाशांनी उमेदवारांचे जाहीर स्वागत केले. गावभेटीदरम्यान उमेदवारांनी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीची ध्येयधोरणे नागरिकांसमोर मांडली.

परिसरातील मूलभूत नागरी सुविधा, पायाभूत विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था तसेच नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत, परिवर्तनाच्या या लढाईत आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा विश्वास व्यक्त करत आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

नागरिकांकडून मिळालेल्या प्रेम, आपुलकी आणि अपेक्षांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी निवडणुकीनंतर सुतारवाडी परिसरात सर्वोत्तम नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला. सुतारवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध असून, नागरिकांच्या सहकार्याने परिवर्तन घडवून आणू, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

You may have missed