बाणेर :
बाणेर–बालेवाडी परिसर हा पुण्यातील एक महत्त्वाचा आयटी हब म्हणून ओळखला जातो. या परिसरात देश-विदेशातील नामांकित आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे असंख्य सुशिक्षित, तरुण आणि प्रगतीशील नागरिक वास्तव्यास आहेत. बदलत्या काळानुसार प्रभागाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर प्रशासन आणि स्थानिक राजकारणातही तितकाच दूरदृष्टी असलेला, आधुनिक विचारांचा आणि शिकलेला नेतृत्व आवश्यक असल्याचे मत आयटी समुदायाकडून व्यक्त होत आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांनी जयेश मुरकुटे यांच्या आगामी स्थानिक राजकारणातील सक्रिय भूमिकेकडे आशेने पाहण्यास सुरुवात केली आहे. पारदर्शक कारभार, शाश्वत विकास आणि नागरिक-केंद्रित निर्णयप्रक्रिया ही त्यांची दृष्टी प्रभागाच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरू शकते, असे मत अनेक आयटी व्यावसायिक व्यक्त करत आहेत.
“आयटीला हवा शिकलेला माणूस” अशी भावना व्यक्त करत नागरिक सांगतात की, स्मार्ट सिटीच्या धर्तीवर पायाभूत सुविधा, वाहतूक, पर्यावरण, डिजिटल सेवा आणि नियोजनबद्ध विकासासाठी जयेश मुरकुटे यांसारख्या सुशिक्षित व्यक्तीचे नेतृत्व प्रभागासाठी फायदेशीर ठरेल.
बाणेर–बालेवाडी परिसराचा झपाट्याने होत असलेला विस्तार लक्षात घेता, केवळ राजकीय अनुभव नव्हे तर आधुनिक तंत्रज्ञानाची जाण, प्रशासनाची समज आणि नागरिकांशी संवाद साधण्याची क्षमता असलेले नेतृत्व काळाची गरज असल्याचे आयटी समुदायाचे ठाम मत आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी