पुणे :
माजी केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या धाडसी आणि दूरदृष्टीपूर्ण राजकीय कारकीर्दीच्या अनेक आठवणी ताज्या झाल्या आहेत. महाळुंगे बालेवाडी क्रीडानगरी उभारून विकासाला चालना देणारे विकासाचे ते शिल्पकार होते.
बाणेर–बालेवाडी–पाषाण महाळुंगे परिसराच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून सुरेश कलमाडी यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि तत्कालीन कलमाडी साहेबांचे सहकारी राहुल दादा बालवडकर यांनी आपल्या भावना व्यक्त करत आठवणींना उजाळा दिला. राष्ट्रकुल स्पर्धेमुळे पाषाण परिसरात मुख्य रस्ता माजी केंद्रीय मंत्री कलमाडी यांनी करून घेतल्याने आज पाषाण परिसर विकसित झाला.
राहुल दादा बालवडकर म्हणाले की, “आजची नवीन पिढी कदाचित याची पूर्ण कल्पना नसावी; मात्र सुरेश कलमाडी यांनी भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष असताना राष्ट्रकुल स्पर्धा पुण्यात भरवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे बाणेर, बालेवाडी, पाषाणसह संपूर्ण परिसराचा विकास झपाट्याने सुरू झाला.”
राष्ट्रकुल स्पर्धांच्या काळात राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री यांच्या स्वागताचा मान तत्कालीन बाणेर–बालेवाडीच्या नेतृत्वाला, म्हणजेच राहुल दादा बालवडकर यांना देण्यात आला होता. हा क्षण परिसराच्या राजकीय व सामाजिक इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरला.
अत्यंत दिलदार, अभ्यासू आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या सुरेश कलमाडी यांच्या निधनाने पुणे शहराने एक अनुभवी आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व गमावले आहे. अशा या महान व्यक्तिमत्त्वाला राहुल दादा बालवडकर यांच्यासह सर्व स्तरांतून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी