बाणेर :
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार गणेश कळमकर यांनी बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सुस आणि महाळुंगे परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये प्रचार दौरा काढत नागरिकांशी थेट संवाद साधला.
या दौऱ्यादरम्यान गणेश कळमकर यांनी घरोघरी भेटी देत नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि स्थानिक प्रश्न समजून घेतले. पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, स्वच्छता, सुरक्षा तसेच मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी मांडलेल्या मुद्द्यांची त्यांनी सविस्तर नोंद घेतली. यासोबतच भाजपाच्या विकासाभिमुख धोरणांची आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या पक्षाच्या स्पष्ट व्हिजनची माहिती त्यांनी नागरिकांना दिली.
या वेळी नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद, आपुलकी आणि व्यक्त केलेला विश्वास हीच आपल्या पुढील कार्याची खरी प्रेरणा असल्याचे गणेश कळमकर यांनी सांगितले. “नागरिकांच्या सहभागातूनच सक्षम, सुरक्षित आणि विकासशील प्रभाग घडवण्याचा आमचा संकल्प आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रचार दौऱ्यादरम्यान युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह विविध घटकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. एकूणच हा प्रचार दौरा सकारात्मक वातावरणात आणि उत्साहात पार पडला.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!