पाषाण :
पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मधील बाणेर, बालेवाडी, सूस, महाळुंगे, पाषाण, सुतारवाडी व सोमेश्वरवाडी या परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या सुशिक्षित तरुण उमेदवारांना नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या प्रतिसादातून प्रभागात परिवर्तनाची सुरुवात झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
सोसायटी भेटी, नागरिकांशी थेट संवाद, समस्या समजून घेणे आणि त्यावर ठोस उपाययोजना मांडणे या माध्यमातून उमेदवारांनी विश्वासार्ह प्रतिमा निर्माण केली आहे. पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, महिला व ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, तसेच युवकांसाठी रोजगार व कौशल्यविकास यांसारख्या मुद्द्यांवर मांडलेली स्पष्ट भूमिका नागरिकांना भावत आहे.
विशेषतः सुशिक्षित तरुण नेतृत्व, पारदर्शक कामकाजाची हमी आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे सोसायट्यांमधील नागरिक, युवक व महिलावर्गाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. “काम करणारा आणि सर्वसामान्यांशी जोडलेला प्रतिनिधी हवा” अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत असून, बदलासाठीचा कौल मजबूत होत असल्याचे चित्र आहे.
या सर्व घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या उमेदवारांच्या बाजूने वातावरण निर्माण झाले असून, येत्या निवडणुकीत परिवर्तनाची लाट अधिक बळकट होण्याची चिन्हे दिसत आहेत.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी