बाणेर :
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. ०९ मधील पल्लोड फार्म्स परिसरात भाजपाचे अधिकृत उमेदवार गणेश कळमकर यांच्या प्रचारार्थ माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी परिसरातील नागरिकांनी विविध नागरी समस्या, सुविधा व विकासाबाबत आपली मते मांडली.
ज्योती कळमकर यांनी नागरिकांचे प्रश्न शांतपणे ऐकून घेत विकासकामांबाबत पक्षाची भूमिका आणि भविष्यातील नियोजन स्पष्ट केले. “खरी ओळख ही लोकांमध्येच ठरते. जनतेचा विश्वास आणि साथ मिळाल्यास निश्चितच प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी चांगले काम करून दाखवू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या जनसंवादाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. थेट संवादामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून भाजपाच्या उमेदवार गणेश कळमकर यांच्या प्रचाराला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र दिसून आले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी