बाणेर :
भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री. गणेश जानोबा कळमकर आणि श्री. लहू गजानन बालवडकर यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक ९ मधील बाणेर येथील एस्टोनिया सोसायटीला भेट देण्यात आली. यावेळी सोसायटीतील रहिवाशांशी थेट संवाद साधत येणाऱ्या निवडणुकीत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रचारादरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांना प्रेम, पाठिंबा आणि आशीर्वाद दिले. नागरिकांनी दाखवलेला विश्वास अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देणारा असून, त्यांच्या अपेक्षांवर खरा उतरून विकासाभिमुख काम करण्याचा निर्धार उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या विविध विकास योजना, लोकहिताच्या उपक्रमांची माहिती नागरिकांना देण्यात आली. तसेच प्रभागातील सुरू असलेली विकासकामे, नागरी सुविधा, पायाभूत सोयी-सुविधा आणि सामाजिक उपक्रमांचा सविस्तर आढावा मांडण्यात आला.
आतापर्यंत नागरिकांनी दाखवलेला विश्वास कायम राखत, यावेळीही ‘कमळ’ या निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निर्णायक मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी