सूस :
पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, सूस येथे दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ख्रिसमस ईव्ह व बोनफायर संध्याकाळच्या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये आनंद, उत्साह व सकारात्मकतेचे वातावरण निर्माण केले.
शाळेच्या मैदानावर सायंकाळी पार पडलेल्या या सोहळ्यात ख्रिसमस बोनफायर, विविध खेळ, सांस्कृतिक सादरीकरणे व खाद्यपदार्थांचे स्टॉल्स यांमुळे परिसर आनंदमय झाला. विद्यार्थ्यांनी नृत्य व गायनाच्या सादरीकरणातून आपली कला सादर करत आत्मविश्वास व सर्जनशीलतेचे दर्शन घडवले.
खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावून विद्यार्थ्यांनी तसेच महिला पालकांनी संघभावना, नियोजन व जबाबदारीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवले. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रगतीसोबतच सामाजिक, सांस्कृतिक व नैतिक मूल्यांचा विकास होत असल्याचे स्पष्ट झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ब्लू हाऊस टीमने विशेष परिश्रम घेतले. कॅप्टन अनुराधा यादव व व्हाईस कॅप्टन वंशिका जाधव यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या लाईटिंग व्यवस्थेसाठी किरण व त्यांच्या टीमचे विशेष योगदान लाभले. तसेच शिवराज सर, मोरे सर व योगिता धाने यांनी केलेले नियोजन व सजावट विशेष उल्लेखनीय ठरली.
कार्यक्रमादरम्यान शिक्षिका प्रफुल्ला पाटील, हेमलता नाईक, श्रद्धा व अँकरिंग टीमने प्रेक्षकांना संपूर्ण वेळ गुंतवून ठेवले. तर पवन सरांच्या मधुर गायनाने संपूर्ण वातावरण आनंदमय झाले.
या उपक्रमाचे आयोजन शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते. या कार्यक्रमातून सूस शाखेतील एकोपा, संघभावना व सहकार्याचे सकारात्मक चित्र स्पष्ट झाले. अशा प्रकारचे शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवले जातील, असा विश्वास मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांनी व्यक्त केला. त्यामुळे हा ख्रिसमस बोनफायर कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय व प्रेरणादायी ठरला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ. रेखा बांदल व सौ. शिवानी बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या नेतृत्वाखाली पर्यवेक्षक श्री. सचिन खोडके, तसेच सौ. स्मिता श्रीवास्तव व सौ. नेहा माळवदे आणि सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या व अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाली. कार्यक्रमासाठी शाळेचे युवा डायरेक्टर यशराज बांदल यांची उपस्थिती उत्साहपूर्ण ठरली.



More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन