बाणेर :
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाणेर गावठाण परिसरात माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर या एक प्रबळ, आश्वासक आणि विश्वासू उमेदवार म्हणून नागरिकांमध्ये ठोस ओळख निर्माण करत आहेत. नागरिकांशी असलेला त्यांचा थेट संवाद, स्थानिक प्रश्नांची सखोल जाण आणि समस्या समजून घेऊन त्या सोडविण्याची सकारात्मक वृत्ती यामुळे नागरिकांचा त्यांच्यावर मोठा विश्वास बसला आहे.
नागरिकांनी व्यक्त केलेल्या प्रत्येक मुद्द्यावर ठोस आणि व्यवहार्य उपाययोजना करण्याचा त्यांनी घेतलेला संकल्प हा केवळ आश्वासनापुरता न राहता विकासासाठी नवी ऊर्जा देणारा ठरत आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, वाहतूक, महिला व युवकांचे प्रश्न यांसह विविध स्थानिक विषयांवर स्वप्नाली सायकर सातत्याने सक्रिय राहिल्या आहेत.
प्रभागामध्ये आश्वासक नेतृत्व म्हणून स्वप्नाली सायकर यांच्यासोबतच प्रल्हाद सायकर यांचेही नाव आदराने घेतले जाते. शांत, संयमी आणि लोकाभिमुख स्वभावातून पक्षासाठी व समाजासाठी केलेली त्यांची अविरत सेवा ही सायकर परिवाराची खरी ओळख आहे. त्याच सेवाभावाच्या जोरावर त्यांनी नागरिकांमध्ये भक्कम व विश्वासार्ह स्थान निर्माण केले आहे.
यामुळेच येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत सायकर परिवार हा भाजपचा आश्वासक व विश्वासू चेहरा म्हणून पुढे येत असून, बाणेर गावठाणसह संपूर्ण प्रभागात त्यांच्या नेतृत्वाकडून विकासाची नवी दिशा मिळेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी