February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजपचा बुलंद चेहरा — अमोल बालवडकर!

बाणेर–बालेवाडी–सुस–महाळुंगे–पाषाण–सुतारवाडी–सोमेश्वरवाडी परिसरात विकासाचे ठोस नेतृत्व पुन्हा चर्चेत

बाणेर :

पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजपच्या नेतृत्वाबाबत एकच नाव ठामपणे समोर येत आहे — माजी नगरसेवक अमोल बालवडकर. आपल्या स्पष्ट, कार्यक्षम आणि जनहिताला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या कामाच्या पद्धतीमुळे अमोल बालवडकर हे या प्रभागातील भाजपचे खंबीर व विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जातात.

बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे, पाषाण, सुतारवाडी आणि सोमेश्वरवाडी या संपूर्ण परिसरात पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, वाहतूक, ड्रेनेज यांसारख्या मूलभूत प्रश्नांपासून ते नागरिकांच्या दैनंदिन छोट्या-मोठ्या अडचणींपर्यंत प्रत्येक विषयात अमोल बालवडकर यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. “आपला माणूस” म्हणून नागरिकांच्या हाकेला तत्काळ प्रतिसाद देणारा नेता म्हणून त्यांनी जनमानसात वेगळीच विश्वासाची जागा निर्माण केली आहे.

फक्त आश्वासनांवर नव्हे, तर प्रत्यक्ष कामातून विकास सिद्ध करणारे युवा नेतृत्व अशी अमोल बालवडकर यांची प्रतिमा आज प्रभागात ठळकपणे दिसून येते. त्यांच्या कार्यकाळातील विकासकामे, नागरिकांशी थेट संवाद आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळेच आज प्रभाग क्रमांक ९ मध्ये “विकास म्हणजे अमोल बालवडकर” अशी स्पष्ट भावना निर्माण झाली आहे.

याच ठोस कामगिरीच्या जोरावर येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचा प्रमुख चेहरा व मुख्य शिलेदार म्हणून अमोल बालवडकर हेच पुढे येतील, हे राजकीय वर्तुळात आता उघडपणे बोलले जात आहे. प्रभागातील नागरिकांचा वाढता पाठिंबा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास पाहता, भाजपसाठी प्रभाग क्रमांक ९ मध्ये अमोल बालवडकर हेच विकासाचे मजबूत नाव असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.