सुतारवाडी :
पाषाण–सुतारवाडी–सोमेश्वरवाडी परिसरातील शिवसेनेच्या पहिल्या शाखेच्या स्थापनेला यंदा ५५ वर्षे पूर्ण झाली. ७ डिसेंबर १९७० रोजी, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पाषाण परिसरातील तरुणांनी एकत्र येत पंचक्रोशीतील पहिली शिवसेना शाखा स्थापन करून इतिहास घडवला होता. या निमित्त शिवसेना शाखा सुतारवाडी यांच्या वतीने शिवदूत महेश सुतार यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीतील पाषाण परिसराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्या वारशाला साजेसे असे शिवसेनेचे बीज या भागात रोवले गेले आणि कालांतराने ते एक भक्कम संघटन म्हणून उभे राहिले.
या गौरवशाली दिवसाच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला. शिवसेनेच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शाखेच्या स्थापनेपासूनचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास आठवून सांगितला.
शिवसेना मनामनात, शिवसेना घराघरात हे ब्रीद कायम ठेवत सामाजिक बांधिलकी, मराठी अस्मिता आणि जनहितासाठी कार्य करण्याचा निर्धार यावेळी पुन्हा एकदा व्यक्त करण्यात आला.
यावेळी बाळासाहेब भांडे महाराष्ट्र राज्य संघटक शिवसेनाUBT, शिव सहकार सेना पदाधिकारी, लीलाधर तात्या सपकाळ, वाढेश्वर तात्या सुतार ज्येष्ठ शिवसैनिक उपशहर संघटिका ज्योतीताई चांदेरे विभाग संघटिका स्वातीताई रणपिसे शाखा संघटिका सुनीताताई रानवडे मयूर दादा भांडे सरपंच, स्वातीताई सूर्यवंशी मराठा सेवक गणेश मोरे तसेच शिवसैनिक नारायण तात्या सुतार,नरहरी भाऊ सुर्वे,रामभाऊ आमले,परशुराम सुतार , हरिभाऊ रणपिसे,दशरथ भाऊ खेडेकर,शंकर दादा सुतार, अमोल फाले सुरज चोरमुले करण कांबळे,मच्छिंद्र चांदेरे ,विठ्ठल दगडे,बाळासाहेब साळुंखे, उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन महेश भीमराव सुतार शिवदूत कोथरूड विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते.


More Stories
पेरीविंकल पौड शाखेत जागतिक योगा दिन उत्साहात साजरा झाला.
*बावधन शाखेतील पेरीविंकल विद्यालयात योग आणि संगीताचा अनोखा संगम!!!* *झुंबाच्या तालावर विद्यार्थ्यांनी गिरवले योगसाधनेचे संगीतमय धडे!!!*
*बावधन च्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सोनक टोयोटाच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृती व वृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न!!!*