बाणेर :
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युवा नेतृत्व जयेश मुरकुटे यांच्या प्रचाराला माता-भगिनींचा भक्कम पाठिंबा मिळताना दिसत आहे. परिसरातील महिलांनी जोमाने प्रचारात सहभाग घेत घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला व जयेश मुरकुटे यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
या जनसंपर्क मोहिमेदरम्यान महिलांनी परिसरातील पाणी, रस्ते, स्वच्छता, सुरक्षितता, आरोग्य व मूलभूत नागरी सुविधांबाबतच्या समस्या मांडल्या. त्याचबरोबर बदलाची अपेक्षा व्यक्त करत तरुण, अभ्यासू व लोकाभिमुख नेतृत्वाला संधी देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
महिला भगिनींच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे परिवर्तनाच्या अभियानाला नवी ऊर्जा मिळाली असून, जयेश मुरकुटे यांचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला आहे. महिलांची ही मिळालेली साथ परिवर्तनाच्या दिशेने निर्णायक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
बाणेर-बालेवाडी, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुस व म्हाळुंगे परिसरात महिलांनी दाखवलेली एकजूट आणि सक्रिय सहभाग हा येणाऱ्या निवडणुकीत महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी