बाणेर :
बाणेर–बालेवाडी परिसरातील युवा नेतृत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे कोथरूड विधानसभेचे कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांनी आज देशाचे ज्येष्ठ नेते, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा झाली.
यावेळी पवार साहेबांनी जयेश मुरकुटे यांना आशीर्वाद देत, “लढ आणि जिंकून ये” असे उद्गार काढत त्यांचा आत्मविश्वास अधिक बळकट केला. या भेटीमुळे परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने या भेटीकडे महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
या संदर्भात जयेश मुरकुटे यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त करताना,
“कड्यांस माझ्या उंचीचा अंदाज नसावा,
कोसळताना नभास घेऊन कोसळलो मी…”
अशा आशयाची पोस्ट करत आपल्या निर्धाराचा आणि आत्मविश्वासाचा सूचक इशारा दिला आहे.
जयेश मुरकुटे यांच्या माध्यमातून बाणेर–बालेवाडी परिसरात एक तरुण, उच्चशिक्षित आणि अभ्यासू नेतृत्व नव्याने पुढे येत असल्याचे चित्र आहे. आदरणीय पवार साहेब तसेच खासदार सुप्रियाताई सुळे यांनी वेळोवेळी जयेश मुरकुटे यांच्या पाठीशी ठाम भूमिका घेतली असून, जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित विविध सामाजिक उपक्रमांना उपस्थित राहून त्यांना पाठबळ दिले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जयेश मुरकुटे हे प्रभागातील नागरी समस्या, पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा आणि नियोजनाशी संबंधित अडचणींचा सखोल अभ्यास करून त्या मुद्देसूद पद्धतीने जनतेसमोर मांडत आहेत. बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, पाषाण, सोमेश्वरवाडी आणि सुतारवाडी यांसारख्या उच्चशिक्षित व आयटी कर्मचारी बहुल परिसरात त्यांच्या कार्यपद्धतीला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
परिणामी, या परिसरातील नागरिकांना जयेश मुरकुटे यांच्या रूपाने नवीन, अभ्यासू, उच्चशिक्षित आणि स्वच्छ प्रतिमेचा विश्वासार्ह पर्याय उपलब्ध झाला असून, आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी