सोमेश्वरवाडी :
सन १९८७ मध्ये मंजूर झालेला सोमेश्वरवाडी ते आयव्हेरी इस्टेट, बाणेर दरम्यानचा ३० मीटर डी.पी. रस्ता तब्बल तीन दशकांहून अधिक काळ केवळ कागदावरच अस्तित्वात होता. उद्घाटनं, फलक आणि आश्वासनांपुरताच मर्यादित राहिलेला हा मार्ग प्रत्यक्षात कधीच पूर्ण झाला नव्हता. परिणामी या परिसरातील नागरिकांना दररोज लांब आणि अडचणीच्या मार्गाने प्रवास करावा लागत होता.
सरळ रस्ता नसल्यामुळे शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. वेळ, इंधन आणि मेहनत यांची मोठी किंमत नागरिकांना रोज मोजावी लागत होती.
हा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न ओळखून त्याला गती देण्याचे काम भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडळ सरचिटणीस सचिन दळवी यांनी हाती घेतले. कोणतेही घटनात्मक पद नसतानाही त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांना विश्वासात घेतले आणि सर्व संबंधित घटकांना एकत्र आणून रस्त्याच्या कामातील अडथळे दूर केले.
सचिन दळवी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तसेच महाराष्ट्र राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठिंब्यामुळे आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरआण्णा मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा तीन दशकांचा रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला.
आज हा रस्ता प्रत्यक्षात पूर्ण झाल्याने सोमेश्वरवाडी आणि बाणेरमधील अंतर लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. रुंद, सरळ आणि दर्जेदार रस्ता, स्ट्रीटलाइट्स व सुरळीत वाहतुकीमुळे नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सोपा आणि सुरक्षित झाला आहे.
हा रस्ता केवळ वाहतुकीपुरता मर्यादित न राहता विकासाचा मार्ग ठरला आहे. रस्ता पूर्ण झाल्यामुळे परिसरातील व्यावसायिक उपक्रमांना चालना मिळाली असून युवकांसाठी नव्या रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे प्रभागातील आर्थिक आणि सामाजिक प्रगतीला वेग आला आहे.
संवाद, एकजूट आणि अथक मेहनतीच्या बळावर विकास घडवून आणणारे नेतृत्व म्हणून सचिन दळवी यांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.





























More Stories
कोथरूड विधानसभा मधील पाषाण-सुतारवाडी लिंक रोड वरील कचऱ्यावरून राजकारण पेटले! अमोल बालवडकरांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; पण तत्परता फक्त ‘खास’ भागापुरतीच का?
सुस परिसर वाहतूक कोंडीबाबत अनिकेत चांदेरे यांच्याकडून वाहतूक पोलिसांना निवेदन
मैत्रीचा धागा, विश्वासाचे नाते! युवा स्पंदनतर्फे चतुःश्रुंगी व कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फ्रेंडशिप डे उपक्रम