महाळुंगे :
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील उच्चशिक्षित उमेदवार प्रियांका विनायक चिव्हे यांनी नागरिकांशी थेट जनसंवाद साधण्यावर भर दिला आहे. परिसरातील विविध भागांमध्ये घरोघरी भेटी देत त्या नागरिकांच्या अडीअडचणी, समस्या आणि अपेक्षा समजून घेत आहेत.
या जनसंवादादरम्यान रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक, शिक्षण तसेच महिलांशी संबंधित प्रश्नांवर नागरिकांनी मोकळेपणाने आपली मते मांडली. त्यावर सकारात्मक आणि अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून उपाययोजना मांडत प्रियांका चिव्हे यांनी आपली विकासात्मक ध्येय-धोरणे नागरिकांसमोर स्पष्ट केली.
सुशिक्षित, अभ्यासू आणि संवेदनशील भूमिका असलेले नेतृत्व म्हणून प्रियांका चिव्हे यांची ओळख या जनसंवादातून अधिक ठळक होत असून त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. “समस्या ऐकून घेणारे आणि त्या सोडवण्यासाठी ठोस आराखडा मांडणारे नेतृत्व हवे आहे,” अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
जनतेशी थेट संवाद साधत विश्वास निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रियांका विनायक चिव्हे नागरिकांच्या मनात घर करत असल्याचे चित्र सध्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये दिसून येत आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी