May 7, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

प्रभाग क्र. ९ मध्ये माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांच्या पुणे महानगरपालिका निवडणूक प्रचाराचा पाषाण गावठाण येथून जल्लोषात शुभारंभ..

पाषाण :

प्रभाग क्र. ९ पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ पाषाण गावठाण येथून मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात करण्यात आला. यावेळी पाषाण, सोमेश्वरवाडी व सुतारवाडी परिसरातील ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला भगिनी, वारकरी संप्रदायातील नागरिक तसेच परिसरातील प्रतिष्ठित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रभागात विविध विकासकामे, सामाजिक उपक्रम, लोकाभिमुख कार्यक्रम, आरोग्य शिबिरे, शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. या कामांमुळे नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला असून प्रचाराच्या शुभारंभाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या प्रचार शुभारंभ प्रसंगी समाजभूषण ह.भ.प. शांताराम महाराज निम्हण, मृदुंगाचार्य पांडुरंग आप्पा दातार, रामभाऊ निम्हण, मा. सभापती सारिकाताई शंकरभाऊ माडेकर, मा. नगरसेविका सुषमा निम्हण, भगवान तात्या निम्हण, कांतिलाल निम्हण, ज्ञानोबा उर्फ शेठजी निम्हण, ज्ञानेश्वर पारखे, जवाहर केदारी, काळूराम मुरकुटे, सुरेश कोकाटे, आंबादास कोकाटे, मधुकर निम्हण, जयप्रकाश निम्हण, पोपटराव जाधव, बळवंत निम्हण, श्याम काकडे, बाळासाहेब लक्ष्मण निम्हण, बालमतात्या सुनार, शंकर सुर्वे, कैलास निम्हण, जयवंत निम्हण, आत्माराम तात्या निम्हण, सुखदेव मांडेकर (अध्यक्ष, मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रचाराच्या माध्यमातून विकासाचा अजेंडा, नागरिकांच्या समस्या आणि भविष्यातील नियोजन थेट जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. आगामी काळात प्रभागातील सर्व घटकांना सोबत घेऊन अधिक गतिमान व सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

 

You may have missed