February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

अमोल बालवडकर यांचा पाण्यासाठीचा लढा : अन्यायाविरुद्ध उभा राहून प्रभाग क्रमांक 9 या परिसराला पाणी मिळवून देणारा संघर्ष..

बालेवाडी :

पाण्यासाठीचा हा संघर्ष केवळ नळातून पाणी मिळवण्यापुरता मर्यादित नव्हता, तर तो माणसाच्या जगण्याचा, स्वाभिमानाचा आणि मूलभूत हक्कांचा होता. १९९७ पासून पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट असूनही बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, पंचवटी आदी परिसर पिण्याच्या पाण्यापासून वंचित होते. लाखोंचा कर भरून, करोडोंचे फ्लॅट असूनही नागरिकांना पिण्यासाठी जारचे पाणी आणि वापरासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत होते, हे त्या भागातील कटू वास्तव होते.

या अन्यायाविरोधात २०१५-१६ मध्ये प्रथमच ठाम आवाज उठवत पाण्यासाठी संघर्ष यात्रा, मोर्चे, आंदोलने तसेच थेट न्यायालयीन लढा उभारण्यात आला. २०१६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेमुळे प्रशासनाला या प्रश्नाची दखल घ्यावी लागली. नवीन बांधकामांना स्थगिती मिळाली आणि पाणीप्रश्न थेट राज्य सरकारपर्यंत पोहोचला.

मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच केंद्रीय राज्यमंत्री श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या महत्त्वपूर्ण योगदानातून बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी व पंचवटी परिसरासाठी २४x७ पाणी योजना मंजूर होऊन ती प्रत्यक्षात आली.

या प्रवासात अनेक राजकीय अडथळे आले, मात्र संघर्ष थांबला नाही. चांदणी चौक सबस्टेशनवर सलग १५ दिवस पहारा देत, स्वतः वॉल्व फिरवून नागरिकांना पाणी पुरवण्यात आले. याच कार्यामुळे ‘नागरिकांना पाणी देणारा नगरसेवक’ अशी ओळख निर्माण झाली. तसेच म्हाळुंगे गावासाठी स्वखर्चातून दररोज ५० टँकर पाणीपुरवठा करण्यात आला. यासोबतच सुस परिसरासाठी ७० कोटी रुपयांची स्वतंत्र पाणी योजना मंजूर करून तिचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.

नागरिकांच्या हितासाठी लढा दिला, तो जिंकला आणि आजही तोच लढा सुरू आहे. जनतेसाठी, जनतेच्या हक्कांसाठी झटणारा हा संघर्षच आज विश्वासाचे नाते निर्माण करतो. त्यामुळे जनता केवळ नगरसेवक म्हणून नव्हे, तर “कामाचा माणूस” म्हणून ओळखते. एका मतातून बदल घडू शकतो, हे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवणारा हा पाण्यासाठीचा संघर्ष आजही प्रेरणादायी ठरत आहे.