पुणे :
पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातून बाहेर पडत आज अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या सोबत प्रभाग क्रमांक ९ मधील इच्छुक उमेदवार व त्यांचे खांदे समर्थक संदीप बालवडकर यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पुणे शहराच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली आहे.
हा पक्षप्रवेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि नेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवून शहराच्या विकासासाठी नव्या जोमाने काम करण्याचा निर्धार प्रशांत जगताप आणि संदीप बालवडकर यांनी व्यक्त केला.
प्रवेशानंतर बोलताना संदीप बालवडकर म्हणाले, “पुणे महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष अधिक ताकदीने मैदानात उतरेल. शहरातील नागरी समस्या, विकासाचे प्रश्न आणि नागरिकांच्या अपेक्षा यांना न्याय देण्यासाठी आम्ही अधिक जोमाने प्रचार करणार आहोत.”
या पक्षप्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला पुणे शहरात नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र असून, आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!