बालेवाडी :
पुणे शहराचे लोकप्रिय खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री (सहकार व नागरी विमान वाहतूक) मा. मुरलीधर (आण्णा) मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त बाणेर-बालेवाडी येथे भव्य महारक्तदान व आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या उपक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी उत्तर मंडळ, बाणेर-बालेवाडी व्यापारी संघटना आणि शिवम बालवडकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
कार्यक्रमादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर आण्णा मोहोळ यांनी स्वतः उपस्थित राहून रक्तदाते, ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि रिक्षाचालकांशी संवाद साधला. त्यांनी आयोजकांचे आभार मानले व अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत पुढेही असे उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले.
या उपक्रमात नागरिक, कार्यकर्ते आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. शिबिरात रक्तदान, नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, तसेच रिक्षाचालकांना मोफत CNG कूपन वितरण असे विविध उपक्रम पार पडले.
रक्तदात्यांसाठी ठेवलेल्या लकी ड्रॉमध्ये इलेक्ट्रिक बाईक, एअरपॉड, स्मार्ट वॉच, हेल्थ इन्शुरन्स यांसारखी आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शिवम बालवडकर (संपर्क प्रमुख, भाजयुमो पुणे शहर), सौ. प्रियांका चिव्हे (सदस्य, भाजपा), आणि संतोष तापकीर (सदस्य, भाजपा) यांनी विशेष परिश्रम घेतले.
नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून, “रक्तदान हेच जीवनदान” या संदेशाला नवा अर्थ प्राप्त झाला आहे.



More Stories
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!