बाणेर :
बाणेर गावठाण परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या ड्रेनेज व मलनिस्सारण समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांनी औंध क्षेत्रीय कार्यालयात सहाय्यक आयुक्त मा. गिरीश दापकेकर साहेब यांची भेट घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निवेदन दिले.
बाणेरमधील कटके विद्यालयाजवळून बाणेश्वर मंदिर व भैरवनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन वारंवार तुंबते. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर ओसंडून वाहत असून परिसरात अस्वच्छता व आरोग्यविषयक अडचणी निर्माण होत आहेत.
या मार्गावर दररोज तसेच धार्मिक सणांच्या काळात हजारो भाविक बाणेश्वर आणि भैरवनाथ मंदिरात दर्शनासाठी येतात, मात्र सांडपाण्याच्या समस्येमुळे त्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो.
या पार्श्वभूमीवर मुरकुटे यांनी सदर ड्रेनेज लाईन तातडीने बदलण्याची व दुरुस्ती करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. या भेटीप्रसंगी परिसरातील स्थानिक नागरिक आणि सहकारीही उपस्थित होते.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!