पाषाण :
पाषाण सुसरोड येथे भाजप कोथरूड विधानसभा उत्तर मंडल सरचिटणीस सचिन दळवी आयोजित “आधार कार्ड नोंदणी अभियान” उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमात नवीन आधारकार्ड नोंदणीसह नाव, पत्ता, जन्मतारीख दुरुस्ती, मोबाईल क्रमांक लिंक करणे, बायोमेट्रिक अद्ययावत करणे अशा विविध सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या.
या वेळी भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, भाजपा नेते गणेश कळमकर, माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, सरचिटणीस मोरेश्वर बालवडकर, शिवम सुतार, सचिन सुतार, तसेच उत्तर मंडल युवा मोर्चा सरचिटणीस जागृती विचारे उपस्थित होते.
नागरिकांना त्यांच्या आधार संबंधित कामांसाठी मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा एकाच छताखाली मिळाल्याने सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.




More Stories
*‘भक्तीचा उत्सव, पर्यावरणाची जपणूक!’ — पेरिविंकल बावधनमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या Eco-Friendly गणेशमूर्ती!!*
वसुंधरा अभियानाच्या २०व्या वर्धापनदिनानिमित्त राजाभाऊ गुडदे फाउंडेशनचा सन्मान
*पेरिविंकलमधील सुस शाखेच्या विद्यार्थ्यांच्या हातून साकारला ‘पर्यावरणपूरक गणराया’!* *शाडू माती गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेतून परंपरेसोबत दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश!!!*