बाणेर :
पुणे महानगरपालिकेचे मा. स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबुरावजी चांदेरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, सरलाअक्का बाबुराव चांदेरे यांच्या उपस्थितीत पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक अध्यक्ष समीर चांदेरे व मा. नगरसेविका रोहिणी ताई चिमटे यांच्या समवेत बाणेर पाषाण लिंक रोडवरील ब्लॉसम अँड स्प्रिंग्स सोसायटीमध्ये बैठक पार पडली.
या बैठकीदरम्यान सोसायटीतील नागरिकांसोबत विविध स्थानिक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बाणेर परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांविषयी नागरिकांनी समाधान व्यक्त करत महानगरपालिकेच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
यावेळी सोसायटी सदस्यांकडून मांडण्यात आलेल्या पाणीपुरवठा, रस्त्यांची देखभाल, वाहतुकीची समस्या तसेच सार्वजनिक सोयीसुविधांशी संबंधित काही मुद्द्यांवर चर्चा झाली. या सर्व समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन नागरिकांना देण्यात आले.
बैठकीत परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला असून, नागरिकांनी प्रशासनाशी थेट संवाद साधून आपली मते मांडली. या उपक्रमामुळे जनतेचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे समाधान उपस्थितांनी व्यक्त केले.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!