महाळुंगे :
बाणेर, बालेवाडी, सुस, पाषाण, महाळुंगे, सोमेश्वरवाडी परिसरातील महिलांसाठी “न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पेठणीचा” हा मनोरंजक कार्यक्रम सौ. प्रियांका विनायक चिव्हे (सदस्य – भाजपा, बी.ई. सिव्हिल) व श्री. विनायक शिवाजी चिव्हे (चिटणीस भाजपा कोथरूड उत्तर मंडल) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम रविवार, दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ५ वाजता माध्यमिक विद्यालय महाळुंगे (पाडळे), क्रीडांगण येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना कुपन वाटप करण्यात आले असून कुपन ड्रॉ द्वारे इलेक्ट्रिक स्कुटी आणि आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.
कार्यक्रमात सहभागी महिलांसाठी साडी आणि पेठणी, फ्रिज, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, कुकर अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सिने अभिनेत्री पूजाताई काळभोर हा कार्यक्रम सादर करणार आहे.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!