रोल बॉल ग्राउंड, बाणेर – पुणे
पुणे लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या ‘खासदार क्रीडा महोत्सवां’ अंतर्गत बाणेर येथील रोल बॉल ग्राउंडवर रंगतदार रोल बॉल स्पर्धांचा उत्साह पाहायला मिळत आहे. आज या स्पर्धेला केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनी भेट देऊन खेळाडू, प्रशिक्षक तसेच क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
‘फिट इंडिया’ आणि ‘खेलो इंडिया’ या पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन आपल्या संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरातील विविध भागात ३७ क्रीडा प्रकारांसह क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, क्रीडा संस्कृती रुजविणे आणि नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
यावेळी महाराष्ट्र रोल बॉल संघटनेचे अध्यक्ष श्री. संदीप खर्डेकर, श्री. राजुभाऊ दाभाडे, भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष लहूआण्णा बालवडकर, श्री. निलेश कोंढाळकर, मा. नगरसेवक अमोल बालवडकर, श्री. बापू मानकर, मा. नगरसेविका स्वप्नालीताई सायकर, माजी नगरसेविका ज्योतीताई कळमकर, गणेश कळमकर, प्रकाशतात्या बालवडकर, राहुल कोकाटे, प्रल्हाद सायकर, सचिन पाषाणकर, दिनेश माथवड, मोरेश्वर बालवडकर, सचिन दळवी, रोहन कोकाटे, अनिकेत चांदेरे, चंद्रकांत जाधव, डॉ. आनंद जराड, सुभाष भोळ, विवेक मेथा, राकेश पाडाळे यांच्यासह खेळाडू, पालक, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी तसेच कोथरूड विधानसभा उत्तर मंडळाच्या सर्व आघाड्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी