म्हाळुंगे :
म्हाळुंगे गावात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर यांच्या वतीने दिवाळी फराळ स्नेहमिलन आणि संगीत मैफलीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गावातील तसेच परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दिवाळीच्या सणानिमित्त गावकऱ्यांमध्ये आपुलकी, एकोपा आणि स्नेह वृद्धिंगत करण्याच्या हेतूने आयोजित या स्नेहमिलन सोहळ्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण केले. कार्यक्रमस्थळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व सणाचा उत्साह दुणावला.
कार्यक्रमाला माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे, माजी नगरसेवक प्रमोद अण्णा निम्हण, माजी नगरसेविका रोहिणी ताई चिमटे, यांच्यासह महाळुंगे गावातील सांप्रदायिक, क्रीडा, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!