बावधन :
आज दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी, चैतन्य विद्या प्रतिष्ठान पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये “वंदे मातरम्” गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक भव्य देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन “वंदे मातरम्” हे गीत एकसुरात गात देशभक्तीचा उत्साह व्यक्त केला. शाळेचा परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व भारतमातेच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. या शुभारंभाने वातावरणात पवित्रता आणि अभिमानाची भावना पसरली. विद्यार्थ्यांनी देशप्रेम, राष्ट्रीय एकता आणि भारतीय संस्कृतीचा संदेश देणारी भाषणे, देशभक्तीपर गीते आणि घोषणांमधून देशाभिमान व्यक्त केला. वंदे मातरम् या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याचे प्रतीक म्हणून ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी १५० आकड्यात उभे राहून गीताला व बंकिमचंद्रजी यांना मानवंदना दिली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे संस्थापक श्री. राजेंद्र बांदल, तसेच संचालिका सौ. रेखा बांदल व शिवानी बांदल व निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित, पर्यवेक्षक श्री. सचिन खोडके, स्मिता श्रीवास्तव आणि नेहा माळवदे, ध्यानेश्वर मोरे , सायली गायकवाड, शिरीन काझी व सुरज साठे यांच्या सहकार्याने पार पडले. या प्रसंगी सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होता.
शेवटी संपूर्ण विद्यालयाने एकतेचा आवाज घुमवला —
🌺 “वंदे मातरम्! भारत माता की जय!” 🌺



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!