सुस :
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सूस आणि म्हाळुंगे परिसरातील लहान क्रिकेटपटूंना व्यासपीठ देणारी “BBSM Little Champions – Under 14 Cricket Tournament” ही स्पर्धा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष समीर चांदेरे यांच्या संकल्पनेतून माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. तीन दिवस चाललेल्या या क्रीडामय स्पर्धेला प्रचंड उत्साहाचे वातावरण लाभले. परिसरातील तब्बल ४५ संघ आणि ६७५ हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
स्पर्धेच्या अंतिम फेरीत अतिशय रोमांचक लढत झाली असून,
🏆 प्रथम क्रमांक – कुमार शांतीनिकेतन सोसायटी, बाणेर-पाषाण लिंक रोड 🥈 द्वितीय क्रमांक – गुलमर्ग सोसायटी, बाणेर 🥉 तृतीय क्रमांक – 43 प्रायव्हेट ड्राईव्ह, बालेवाडी व वेदांत रेसिडेन्सी, सुस या संघांनी अनुक्रमे यश संपादन केले.
स्पर्धेतील विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये – ⭐ उत्कृष्ट खेळाडू: विहान परब (कुमार शांतीनिकेतन सोसायटी, बाणेर-पाषाण लिंक रोड) ⭐ उत्कृष्ट गोलंदाज: श्रवण घोडेकर (गुलमर्ग सोसायटी, बाणेर) ⭐ उत्कृष्ट फलंदाज: हर्षवर्धन गायकवाड (43 प्रायव्हेट ड्राईव्ह, बालेवाडी)
माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराचे उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर, सौ. सरला चांदेरे आणि सुस-म्हाळुंगे-बावधन विविध विकास सोसायटीच्या चेअरपर्सन सौ. अर्चना धनकुडे यांच्या हस्ते विजेते आणि उत्कृष्ट खेळाडूंना पारितोषिके देण्यात आली.
या वेळी मैदानावर खेळाडूंचा जोश, पालकांचा उत्साह आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर यामुळे प्रत्येक सामना संस्मरणीय ठरला. या स्पर्धेच्या माध्यमातून लहानग्या क्रिकेटपटूंना संघभावना, शिस्त आणि जिद्द या क्रीडामूल्यांचा उत्तम अनुभव मिळाला.
या उपक्रमामागे समीर चांदेरे यांची प्रेरणादायी संकल्पना आणि BBSM टीमचे संघटनात्मक नियोजन व मेहनत हेच यशाचे प्रमुख घटक ठरले. स्पर्धेचा समारोप जल्लोषात झाला असून, परिसरातील क्रीडा संस्कृतीला या उपक्रमामुळे नवे बळ मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!