बालेवाडी :
बालेवाडी येथे पुण्यनगरीचे लोकप्रिय खासदार व केंद्रीय राज्यमंत्री (सहकार व नागरी विमान वाहतूक) मा. मुरलीधर (आण्णा) मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान महायज्ञ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे.
या सामाजिक उपक्रमात रक्तदान शिबिराबरोबरच नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप यांचेही आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
📅 दिनांक: ७ नोव्हेंबर २०२५
🕙 वेळ: सकाळी ९ ते सायंकाळी ५
📍 स्थळ: साफा बँक्वेट्स, बालेवाडी, पुणे
रक्तदात्यांसाठी आकर्षक भेटवस्तूंची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक रक्तदात्यास Airpods, Smart Watch आणि Health Insurance यांसारख्या गिफ्ट्स दिल्या जाणार आहेत, तसेच लकी ड्रॉ मधून एका भाग्यवान रक्तदात्यास इलेक्ट्रिक दोनचाकी वाहन भेट म्हणून दिले जाणार आहे.
“रक्तदान म्हणजे जीवनदान!” या भावनेतून समाजोपयोगी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सहभागी होऊन नागरिकांना आपला सामाजिक सहभाग नोंदविण्याची संधी मिळणार आहे.
आयोजक:
शिवम बालवडकर – संपर्क प्रमुख, भाजयुमो पुणे शहर
सौ. प्रियांका चिव्हे – सदस्या, भारतीय जनता पार्टी
संतोष तापकीर – सदस्य, भारतीय जनता पार्टी
संयोजन:
भारतीय जनता पार्टी, उत्तर मंडळ – बाणेर-बालेवाडी व्यापारी संघटना, शिवम बालवडकर फाउंडेशन
🩸 मानवतेसाठी रक्तदान करा, जीवनाला नवा श्वास द्या!


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी