सुतारवाडी :
सुतारवाडी परिसरातील मनपा शाळा क्रमांक ७१ बी – वेणूताई यशवंतराव चव्हाण प्राथमिक विद्यालय या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शबनम नियतवयो माने जमादार मॅडम या आपल्या ३७ वर्षांच्या यशस्वी व प्रदीर्घ सेवेनंतर वयाच्या ५८व्या वर्षी सेवानिवृत्त झाल्या.
शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यात लोकप्रिय असलेल्या सौ. जमादार मॅडम यांनी आपल्या कार्यकाळात शाळेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अनेक उपक्रम राबवले. त्यांनी सुतारवाडी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या तसेच शाळेची गुणवत्ता आणि उपक्रमशीलता वाढविण्यात मोलाचे योगदान दिले.
त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकवर्गात हळहळ व्यक्त करण्यात आली. सौ. जमादार मॅडम समाधान आणि तृप्ततेच्या भावनेने सेवेतून निवृत्त होत आहेत.
त्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या सक्रिय कार्यकर्त्या असून, संघटनेच्या महिला आघाडी व पदाधिकाऱ्यांनी त्यांना सेवानिवृत्तीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. एका संघनिष्ठ, समर्पित आणि प्रेरणादायी शिक्षिकेचा निरोप घेताना सर्वांनी “त्यांची उणीव कायम भासेल” असे भावनिक उद्गार काढले.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी