निगडी :
योगीराज पतसंस्थेची शाखा कृष्णानगर येथील ७ वी मासिक सभा संस्थेच्या कार्यालयात संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली.
या सभेत महत्त्वाचा निर्णय घेत कृष्णानगर शाखेचे उपाध्यक्षपदी श्री. अनिल खैरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडीनंतर त्यांचा सन्मान संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर आणि जय शिवराय ज्येष्ठ नागरिक संघ, शाहूनगर चे अध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी शाखाध्यक्ष आप्पाजी सायकर, संचालिका सौ. अलका सिरसगे, शाखा संचालक दत्तात्रय भापकर, रामदास जाधव, प्रदीप नेवाळे, पांडुरंग कदम, तसेच ज्येष्ठ नागरिक दिनकर पंडित आणि संस्थेचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता.
यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर म्हणाले की, “संस्थेच्या सर्व शाखांनी एकत्रितपणे कार्य करून सभासदांना चांगल्या सेवा देणे हेच आमचे ध्येय आहे. पारदर्शक व विश्वासार्ह कारभारातून पतसंस्था आणखी बळकट करायची आहे.”


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी