औंध :
औंध येथील परिहार चौकात होणारे राजमाता जिजाऊ स्मारकाचे काम बऱ्याच दिवसांपासून रखडले असून ते त्वरित पुर्ण करावे म्हणून नागरीकांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज भक्त आणि राजमाता जिजाऊ स्मारक कृती समितीच्या वतीने औंध क्षेत्रीय कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त गिरीश धापकेकर यांना मोहल्ला कमिटी बैठकी दरम्यान निवेदन देण्यात आले.
औंध गावातील परिहार चौकात होणारे राजमाता जिजाऊ स्मारक हे सर्वांसाठी प्रेरणा दायी आणि अभिमान असणारे असणार आहे परंतु वर्षापेक्षा अधिक काळ होऊन देखिल स्मारकाचे काम रखडले असुन प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ते लवकर पूर्ण होऊन चौकाची शोभा वाढवावी तसेच स्मारकाच्या जागे जवळ असणारे स्वच्छतागृह आणि स्मारक यांच्यामध्ये सीमा भिंत बांधून यास होणाऱ्या स्फूर्ती दायक स्मारकाचे पवित्र राखावे : राजमाता जिजाऊ स्मारक कृती समिती
शिवभक्त गणेश कलापूरे यांनी सहाय्यक आयुक्त गिरीश धापकेकर यांना नागरीकांच्या वतीने निवेदन दिले.
More Stories
गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात मानसशास्ञाचा ‘कॅलिडोस्कोप १६’ अंकाचे प्रकाशन
औंध येथील अमोल दत्तात्रय टेंबरे यांना भारत भूषण पुरस्कार प्रदान…
ग्राफिटीच्या हौशी कलाकारांचे चित्र प्रदर्शन संपन्न…