November 10, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

औंध लाईट हाऊसच्या दिवाळी मेळाव्याचे सुनील माने यांच्या हस्ते उद्घाटन 

औंध :

स्थानिक उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी औंध लाईटहाऊसच्या वतीने दिवाळी मेळा आयोजित करण्यात आला होता. या मेल्याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी लाईटहाऊसच्या क्लस्टर हेड अश्विनी चौधरी, उद्योजक विकास कार्यक्रम आणि मार्केट ऍक्सेस लीड रुपेश कुराडे, औंध केंद्र प्रमुख रचना लुई, सहाय्यक व्यवस्थापक विभाग सरकार लायसनिंग लखन रोकडे, विद्यार्थी संबंध अधिकारी अंकिता भाले यांच्यासह लाईटहाऊसचे विद्यार्थी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना सुनील माने म्हणाले, शहरातील गरजू तरुणांमध्ये असलेल्या कौशल्यांचा विकास घडवून आणून त्यांना स्वत:च्या पायावर उभे रहाता यावे, त्यांचे भवितव्य चांगले घडवण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून लाईट हाउस प्रकल्प चालवला जातो. वस्तीतील तरुण त्यांच्या करिअरच्या दृष्टीने गोंधळलेले असतात, लाईट हाउस त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचा कौशल्य विकास करतात. त्या आधारे त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देते. ही अतिशय चांगली गोष्ट असून आज दिवाळी मेळ्याच्या स्वरुपात स्थानिक व्यकींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देत आहेत ही अतिशय चांगली गोष्ट आहे. भविष्यात महापालिकेमार्फत या उद्योजकांना कायम स्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

लाईटहाऊसच्या क्लस्टर हेड अश्विनी चौधरी म्हणाल्या, लाईट हाऊस ग्लोबल अपॉर्च्युनिटी युथ नेटवर्क लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन द्वारे स्थानिक उद्योजकांसाठी दिवाळी मेळा आज आयोजित करण्यात आला होता. विशेषतः महिला, अपंग व्यक्ती, आणि महिला बचत गटांच्या सदस्यांना आधार देण्यासाठी आणि त्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा मेळा नियोजित होता. लाईटहाऊसच्या उद्योजकता विकास कार्यक्रमाद्वारे, ते या उद्योजकांना व्यासपीठ देऊन मदत करत आहोत, जेणेकरून त्यांचा ग्राहकांशी थेट संपर्क व्हावा आणि त्यांचा व्यवसाय वाढावा. कालांतराने त्यांना मजबूत, स्वतंत्र आणि शाश्वत उद्योजक बनण्यासाठी मार्गदर्शन आणि समर्थन देणे हे यासाठी लाईटहाऊस प्रयत्न करते. तसेच या उद्योजकांना सरकारी योजना, कंपन्या, व्यक्तींशी जोडण्यास आणि नेटवर्क तयार करण्यास देखील आम्ही मदत करतो. हा मेळा स्थानिक प्रतिभेला सक्षम करण्यासाठी आणि त्यांना स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी चांगले भविष्य घडवण्यास मदत करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. असेही त्या म्हणाल्या.